यवतमाळ : ढाणकी पुलावरून कंटेनरचा क्लिनर गेला वाहून - ढाणकी पूर न्यूज
यवतमाळ - रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून माहूर औरंगाबाद महामार्गाचे काम संथ गतीने चालू आहे. याचाच फटका रूद्रानी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या क्लिनरला बसला आहे. ढाणकीच्या पुलावरील पाण्यामुळे शेख कलाम शेख सत्तार हा 35 वर्षीय क्लिनर वाहून गेला आहे. ढाणकी मार्गे फुलसावनगीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल निर्मितीचे काम चालू आहे. यामुळे जुन्या पुलाला तडे गेल्याने आपला जीव मुठीत घेऊन प्रवशांना प्रवास करावा लागतोय. हा पूल पावसाळ्यापूर्वी तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीला कळवले होते. पहिल्याच पावसात या पुलामुळे जुन्या पुलावरून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताची सूचना अनेकवेळा रुद्राणी कंपनीला दिली होती. परंतु कंपनीने याकडे कानाडोळा केला. आता रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असलेल्या टिप्परचा क्लिनर ढाणकीकडे पायी येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात नाल्यात वाहून गेला. प्रत्यक्षदर्शींनी नदीत उड्या मारून त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही.