महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video: अन् उद्दाम चालकानं पुराच्या पाण्यात घातली बस, पाहा पुढील थरार, पुढे काय झालं... - Raigad mahad

By

Published : Jul 13, 2021, 7:54 PM IST

Updated : Jul 15, 2021, 12:57 PM IST

रायगड - जिल्ह्यात 12 जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहत होत्या. महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातील नद्याही ओसंडून वाहू लागल्या होत्या. रस्त्यावरून नदीचे पाणी वाहत असताना खाडी पट्यातून महाडकडे येणाऱ्या एसटी बस चालकाने प्रवाशांचा आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकून बस पाण्यात टाकली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. बस चालकाने एसटी बस सुखरूप बाहेर काढली. मात्र पाणी रस्त्यावरून वाहत असताना अशी बेफिकीर करणे योग्य नाही. चालक विजयकुमार जाधव याला या केलेल्या बेफिकिरीमुळे निलंबन करण्यात आले आहे. जाधव हे पिंपरी-चिंचवड आगारातील कर्मचारी आहेत.
Last Updated : Jul 15, 2021, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details