सतत मागणी करुनही पुलाची उंची वाढविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा जीव मुठीत धरुन प्रवास
वाशिम - मालेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांगरी नवघरे गावानजीक पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरून पाणी वाहत असते. या दोन्ही गावातील नागरिकांना पुलावरून जीवघेणा प्रवास करावे लागत आहे. पुलाची उंची वाढवण्याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला वेळोवेळई निवेदन दिले. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पुलावरुन दरवर्षी पाणी वाहतो, त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन पुलावरुन ये-जा करावी लागते. सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही लक्ष दिले जात नाही, अशी प्रतिक्रिया दत्तात्रय शिंदे यांनी दिली.