आंदोलन शांततेतच झाले पाहिजे, पालकमंत्री यशोमती ठाकूरांचे आवाहन
अमरावती - केंद्र सरकारच्या सुधारीत नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या बंद दरम्यान अमरावतीच्या इर्विन चौक परिसरात वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने या बंदला हिंसक वळण प्राप्त होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यातच काही आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला होता. दरम्यान, आंदोलन करा मात्र, ते शांततेत झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.