'या' ठिकाणी आदिवासी मुलांना शेतात मिळतात शिक्षणाचे धडे, विवेकानंद दिसले यांचे स्तुत्य उपक्रम - ऑनलाइन शिक्षणापासून वंचित बातमी
पालघर (तलासरी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद आहे. यामुळे ऑनलाइन वर्ग भरविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, अनेक ठिकाणचे विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे तलासरी तालुक्यातील सुत्रकार गावातील महाराष्ट्र विद्या मंदिर येथील शिक्षक विवेकानंद देसले यांनी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे सर्व नियम पाळत शेतातच शैक्षणिक धडे देत आहेत.