येवल्यातील 'हा' शिक्षक रोज शेततळ्यातील पाण्यात करतो योगासने - शेततळ्यातील पाण्यात योगासने
येवला - तालुक्यातील नागडे गावातील शिक्षक शिवाजी साताळकर हे दररोज एक तास शेततळ्यामधील पाण्यात योगासने करतात. आजही शिवाजी साताळकर यांनी पाण्यात योगासने करत योग दिन साजरा केला. पाण्यात योगासने करण्याची कल्पना या शिक्षकाला सुचली व त्यांनी पाण्यात योगासने करण्यास सुरुवात केली. ते पद्मासन, शवासन, शलभासन असे विविध प्रकारचे योगासन ते पाण्यात करतात.