Union Budget 2022 Expectations : दागिन्यांत संबंधीत स्टॅम्प ड्यूटीसह कर कमी व्हावे; जळगावातील सराफ व्यायवसायिकांच्या अपेक्षा
जळगाव - आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला. ( Union Budget 2022 ) या अर्थसंकल्पाकडे जळगावची सुवर्णनगरीचेही लक्ष लागून आहे. अर्थसंकल्पापूर्वीचा सोन्याचे ग्रॅमचे दर ४८ हजार ३०० आणि १० ग्रॅमचे चांदीचे दर ६३ हजार रुपये असे आहेत. दागिन्यांत संबंधीत स्टॅम्प ड्युटीसह इतर कर जर कमी झाले तर त्याचा सकारात्मक परिणाम सोने बाजारावर होईल ग्राहकांची संख्या वाढेल सर्वसामान्यांच्या आवाक्यात सोन्याचे दर होतील. त्यामुळे व्यावसायिकांनाही तर ग्राहकांनाही त्याचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ( Union Budget 2022 Expectations ) जळगावातील सराफ व्यावसायिकांनी बोलताना व्यक्त केली.