VIDEO : खतांचे दर वाढवल्याच्या निषेधार्थ 'स्वाभिमानी'चे केंद्र सरकारच्या पुतळ्याला 'जोडे मारो आंदोलन' - जोडे मारो आंदोलन परभणी
परभणी - केंद्र शासनाने दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना खताची बॅग 50 ते 200 रूपयांनी महाग घ्यावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी ही दरवाढ सहन करत आहे. विशेष म्हणजे याच दोन वर्षात साथ रोगांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, यातून बाहेर काढण्याऐवजी सरकार खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांचे संकट आणखी वाढवण्याचे काम करत आहे, असा आरोप करत आज (मंगळवारी) परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीकाही करण्यात आली.