निलंबित एसटी कामगाराने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहले पत्र
वाशिम - राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर असल्याचे सांगत वाशिम, रिसोड, कारंजा व मंगरुळपीर या चार आगारातील 66 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एक निलंबित एसटी वाहकाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहीले आहे. रामेश्वर मुसळे, असे त्या वाहकाचे नाव असून त्यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.