पुणे : मावळमध्ये पोलिसांना पाहताच संशयितांनी काढला पळ; पहा व्हिडिओ... - मावळ पोलीस
मावळमधील कामशेतमध्ये पोलीस आणि संशयित व्यक्तीचा थरार असलेला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. काही संशयित व्यक्ती थांबले असल्याची माहिती कामशेत पोलिसांना मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी जाऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, वेळप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकारी सुरेखा शिंदे यांनी पिस्तुलही रोखले मात्र संशयित व्यक्ती फरार झाले. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त कॉलनी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहन थांबले असल्याची माहिती कामशेत पोलिसांना स्थानिकांनी फोनवरून मिळाली. तत्काळ पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आपले वाहन संशयित व्यक्तीच्या वाहनाच्या समोर उभे केले. हे पाहून संशयित व्यक्तींनी त्याचे वाहन मागे घेतले, तेव्हा महिला अधिकारी शिंदे यांनी खाली उतरून पिस्तुल काढले, परंतु तेवढ्या वेळात अज्ञातांनी तेथून पळ काढला. त्यांचा पाठलाग पोलिसांनी केला परंतु, मात्र ते संशयित पोलिसांच्या हाती लागू शकले नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Last Updated : Jun 23, 2021, 7:17 AM IST