शेतकऱ्यांच्या रेलरोको आंदोलनाला कोल्हापुरातून भाकपचा पाठिंबा - कोल्हापूर रेलरोको आंदोलन व्हिडिओ
कोल्हापूर - कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. त्यांनी आज देशव्यापी रेलेरोको आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला भारतीय कम्यूनिस्ट पक्षाने कोल्हापुरात पाठिंबा दिला आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये रेलेरोको आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी भाकपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.