कोरोना आईच्या नावानं... बार्शीत अंधश्रद्धेपोटी चक्क कोरोना देवीची स्थापना - सोलापूर अंधश्रद्धा निर्मूलन समिती
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा बिमोड करण्यासाठी बार्शी येथील पारधी वस्तीत कोरोना देवीच्या मंदिराची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या कोरोना देवीच्या मंदिरात कोंबडी व बकऱ्यांचे बळी देखील देण्यात येत आहेत. बार्शी शहरातील मुख्य रस्त्यावर पारधी वस्ती आहे. या ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देव्हारा असलेल्या देवघरात लिंबू ठेऊन स्थानिकांनी कोरोना देवीची स्थापना केली आहे. पाहा 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट...
Last Updated : Sep 3, 2020, 7:18 AM IST