सुनील पाटील राष्ट्रवादीचा वाझे क्रमांक दोन आहे का?- प्रसाद लाड
मुंबई - राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या सुनील पाटील याच्यावर आरोप करत मोहित कंबोज यांनी ड्रग्ज प्रकरणात नवे वळण आणले आहे. यात तथ्य किती आहे आणि सुनील पाटील वाझे क्रमांक दोन आहे का? हे राष्ट्रवादीने स्पष्ट करावे, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.