covid 19: वर्ध्यात बंदचे पालन न करणाऱ्या दुकानावर कारवाई... - वर्धा कोरोना बातमी
कोरोनाचा विळखा राज्यात झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्व मोठे धार्मिक स्थेळे, माॅल्स, शाळा, महाविद्यालये, गर्दीचे ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. त्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरिही काही दुकाने वर्धात सुरु आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी आज विशेष मोहीम राबवून अशा दुकानावर कारवाई केली.