VIDEO : नागपुरात विद्यार्थ्यांनी उभ्या खासगी स्कूल बसच्या काचा फोडल्या, घटना सीसीटीव्हीत कैद - नागपुरात विद्यार्थ्यांनी स्कूल बस फोडली
दहावी बोर्डाची परीक्षा होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी नागपूरच्या मेडिकल चौकात एकत्र येत आंदोलन केले. यावेळी मेडिकल चौकात जात असताना त्यांनी मनपाची आपली बस सेवा या बसची काच फोडली. तसेच मेडिकल चौकात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विद्यार्थी पळत सुटले. यावेळी तेथे उभी असलेल्या जुन्या स्कुलबसची तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हे सीसीटीव्ही ईटीव्ही भारतच्या हाती लागले आहे. यामध्ये विद्यार्थी जेव्हा धावात सुटले त्यावेळी त्यांनी उभ्या बसवर दगडफेक करताना आणि पळताना दिसून येत आहेत.