Nashik Corona Vaccine : येवल्यातील 16 वर्षीय मुलाला कोव्हॅक्सीनऐवजी कोविशील्डची लस; पालक संतप्त - nashik yeola vaccine student
येवला (नाशिक) : आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, नाशिक मधील येवल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाटोद्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 16 वर्षीय अथर्व पवार यास कोव्हॅक्सीनऐवजी चक्क कोविशील्ड लस दिली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.