VIDEO : दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑनलाइन घ्या, विद्यार्थ्यांचे आंदोलन - विद्यार्थी आंदोलन
दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, या मागणीसाठी आज नागपूरच्या शेकडो विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. मेडिकल परिसरातील त्रिकोणी पार्क येथे हे सर्व विद्यार्थी गोळा झाले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना मेडिकल चौकात काही विद्यार्थी हिंसक झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांनी सिटी बसच्या काचा देखील फोडल्या आहेत. पोलिसांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात माहिती समजताच पोलिसांनी मेडिकल चौकात जाऊन विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थी कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.त्यामुळे पोलिसांनी विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटण्याकरिता घेऊन गेल्यानंतर हे विद्यार्थी शांत झाले आहेत.