अद्यापही कोल्हापुरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी नाही - kolhapur strict restrictions news
कोल्हापूर - राज्यात लॉकडाऊन होऊन 24 तास उलटले असले तरी मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा अद्याप खुल्याच आहेत. किनी टोलनाका परिसरात कोणतीच उपाययोजना सुरू नसल्याने प्रवाशांनी कोल्हापूरात बिनधास्तपणे प्रवेश केला आहे. माध्यमांचे कॅमेरा दिसताच पोलिसांनी केवळ कारवाईचा फास दाखवला. मात्र, या वाहनांची नोंद ठेवली नाही. त्यामुळे भविष्यात कोरोना संक्रमणाचा धोका जिल्ह्यात गडद होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला.