वैजापूर येथे रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी - vaijapur fights in farmers
वैजापूर (औरंगाबाद) - येथे रस्त्याच्या वादातून शेजारी शेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील उंदिरवाडी गावात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यामध्ये शेतकऱ्यांसह महिलांनाही बेदम मारहाण केली आहे. महिलांचा विनयभंग करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिऊर पोलिसांकडून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.