क्रूझ पार्टी प्रकरण : कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही - गृहराज्यमंत्री सतेज पाटील - गृहराज्यमंत्री सतेज पाटील
अमरावती - क्रूझ पार्टी मधील ड्रग्ज प्रकरनात अटक झालेल्या आर्यन खान ला मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल पंचवीस दिवसानंतर जामीन मंजूर केला आहे. तर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनाही न्यायालयाने दिलासा दिला आहे. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहे. यात कायद्याचे पालन केले जात आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र फर्जी असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यासंदर्भात राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. परंतु त्याच्यावर न्यायालयाने स्थगिती आणण्याची प्रतिक्रियाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिली.