मुंबईतील लोकल सुरू करा; भाजपाकडून आंदोलन - भाजपाकडून आंदोलन
नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा अजूनही मिळालेली नाही. 50 टक्क्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय सेवा सुरू करणे योग्य होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. आता पुरेसे लसीकरण झाले आहे. मात्र तरीदेखील लोकल प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. याच्या निषेधार्थ मुंबई येथे भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.