ST Workers strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा - मंत्री भारती पवार - ST workers strike
येवला (नाशिक) - पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदार संघात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी वीज प्रश्नी शेतकऱ्यांनी मंत्री भारती पवार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा असून महाविकास आघाडी सरकार या एसटी कर्मचाऱ्यांवर दडपशाही आणून निलंबनाची कारवाई करत आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या करता मुख्यमंत्र्यांना व परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मंत्री भारती पवार यांनी दिली.