चौथ्या दिवशी सुद्धा कोल्हापूरातील एसटी वाहतूक ठप्प; कर्मचारी संतप्त
एसटी महामंडळ बरखास्त करून त्यांचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील एसटी कर्मचारी ठिय्या मांडून बसले आहेत. चार दिवसांपासून जिल्ह्यातील संपूर्ण वाहतूक ठप्प आली असून जवळपास अडीच कोटींचे नुकसान झाले आहे. म्हणूनच एसटी स्टँड परिसरात खासगी वाहतुकीला परवानगी देण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारीही आता संतप्त झाले असून खासगी वाहतूकदारांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत अशा पद्धतीचे कृत्य करू नये असे आवाहन केले आहे. या संदर्भातच कोल्हापुरातील बसस्थानक परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.