ST Workers Strike Issue : अनिल परब यांनी जाहीर केलेला निर्णय मान्य नाही - एसटी कर्मचारी - एसटी महामंडळ
कोल्हापूर - गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरु असलेला एसटी कामगारांचा संप (ST workers strike) आज मिटेल असे संकेत होते. परिवहनमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय जाहीर करणार होते. मात्र परिवहनमंत्र्यांनी जे निर्णय जाहीर केले आहेत, त्याला कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. शिवाय आम्हाला हे मान्य नसून जोपर्यंत आमची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे हे मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरुच राहणार, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शिवाय कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.