थकीत महागाई भत्ताच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनाकडून 'बेमुदत उपोषण' - एसटी कर्मचारी संघटनाकडून 'बेमुदत उपोषण'
जालना - थकीत महागाई भत्ता, वाढीव घरभाडे देण्यात यावे. शिवाय १५ हजार रूरये दिवाळी बोनस देण्यात यावा, यासह ११ मागण्यासाठी जालन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संयुक्त क्रांती समितीच्या माध्यमातून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जालन्यातील विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर हे उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणात एसटी कर्मचारी सहभागी झाले असून राज्य सरकारने तातडीने या मागण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.