ST Workers Strike Issue : जालन्यात राज्य सरकारच्या निर्णयाचा रोष व्यक्त करत एसटी वाहकाने स्वत:ला केले जखमी
जालना - राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाबाबत ( ST Workers Strike Issue ) निर्णय दिला. या बैठकीतील निर्णयानंतर सरकारवर जालना आगारातील एका एसटी वाहकाने ( ST Carrier Jalna ) काचेच्या खिडकीवर हात मारून सरकारच्या निर्णयावर रोष व्यक्त केला आहे. रागाच्या भरात एसटी कर्मचाऱ्याने काचेच्या खिडकीवर हात मारल्याने त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत. या कर्मचाऱ्याला सध्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भानुदास कस्तुरे असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्णयाबाबत आपण हे रोष व्यक्त केल्याची माहिती वाहकाने दिली आहे.