Nagpur ST Worker Suicide Attempt : आर्थिक विवंचनेतुन एसटी कर्मचाऱ्याचा आत्मत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल - नागपूर एसटी कर्मचारी आत्महत्या प्रयत्न
नागपूर - सुरेश नारायण बुधे या एसटी कर्मचाऱ्याने आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात त्याच्या शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुधे यांनी आत्महत्येपूर्वी स्वतःची आर्थिक विवंचना सांगणारा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून काही सहकाऱ्यांना पाठवला होता. त्यानंतर सुरेश बुधे यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे.