...तोपर्यंत एसटीचा संप चालूचं राहणार - गोपीचंद पडळकर
सांगली - राज्य सरकारमध्ये एसटीचा विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत एसटीचा संप चालूच राहील आणि मध्यरात्रीनंतर हा संप सुरू होणार असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना स्पष्ट केले आहे. काही कामगार संघटनांना हाताशी धरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी काही घोषणा केल्या आहेत, पण एसटी कर्मचाऱ्यांची मूळ मागणी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, मात्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही घोषणा केल्या आणि काही एसटी कामगार संघटनांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. पण जोपर्यंत एसटीचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहील, अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर करत संपाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता मध्यरात्रीनंतर एसटी कर्मचारी संपावर जाणार की ? संप मागे घेणार हे स्पष्ट होणार आहे.