सांगलीमध्ये एसटी कर्मचारी बेमुदत संपावर; प्रवाशांचे हाल - ST BUS Employee goes on strike
एसटी कर्मचारी संघटना व राज्य सरकार यांच्यात झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे पहाटेपासूनच सांगलीमध्ये एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी संघटना राज्य सरकारकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. कोरोनाकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला होता. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न सूटलेला नाही. मागण्या पूर्ण न झाल्याने आज पासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.