राज्यभरात पुराचा कहर... पीकं जमीनदोस्त; तर शेतांना तळ्याचे स्वरुप!
राज्यभरात दोन दिवस परतीच्या मान्सूनने हाहाकार माजला. काही ठिकाणी ढगफुटी झाली तर, अनेक भागांत मुसळधार पावसाने सगळ्यांना झोडपलं. शहरं तुंबली तर अनेक गावांचा संपर्क तुटला. पश्चिम महाराष्ट्, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली. यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून झाला आहे. पण अतिरेक सुद्धा जीवाशी येतो. याची प्रचिती कालच्या पावसाने आली. राज्यभरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'च्या विशेष रिपोर्टमधून....