...तर कोरोनाचा काहीही धोका नाही - डॉ. कुलदीपराज कोहली
मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मागील ७ महिन्यांत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय आणि राज्यातील टास्क फोर्सच्या माध्यमातून ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, आपण आयुष विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास आपल्याला कोरोनाचा काहीही धोका नाही, असे मत राज्यातील टास्क फोर्सचे सहसंचालक तसेच आयुर्वेद आणि आयुष महाराष्ट्राचे संचालक डॉ. कुलदीपराज कोहली यांनी व्यक्त केले आहे.