नागपूर; जातीच्या राजकारणावर सकारात्मक विचाराचे राजकारण भारी पडणार- बंटी शेळके - central nagpur election news
नागपूर - येथील सर्वात काट्याची लढाई ही मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात होणार आहे. येथे भाजपचे आमदार विकास कुंभारे विरुद्ध काँग्रेसचे तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या बंटी शेळके यांच्यात थेट लढत होणार आहे. मध्य नागपुरातील महाल या भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान आहे. तिथून बंटी यांनी महानगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळेच बंटी शेळकेंच्या उमेदवारीमुळे विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे. मात्र, शेवटी मध्य नागपूरमध्ये जातीचे राजकारण तेजीत आहे. येथे हलबा समाजचे प्राबल्य असल्याने बंटी शेळके यावर कसा तोडगा काढतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे..त्याच्यासोबत बातचीत केलीये प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी...