Pandharpur Wari 2021 विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास - पंढरपूरची यात्रा
पंढरपूर (सोलापूर) - मंगळवारी आषाढ देवशयनी एकादशी साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गुलाब, ऑर्किड्स, एनथोरीयम, जरबेरा फुलांनी सजविण्यात आले आहे. गाभाऱ्यात फुलांची आरास केल्याने विठ्ठलाच्या या रुपाला पाहून मन प्रसन्न करणारे वातावरण मंदिरात तयार झाले.