ऐकलं का.. गाईने दिला दोन तोंडे असणाऱ्या वासराला जन्म
शेतीला जोडव्यवसाय म्हणून देविदास दाते यांच्या गोठ्यात गाईंचे संगोपन केले जाते. ४ दिवसांपासून गाई वासराला जन्म देण्यासाठी तडफडत होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी गाईची तपासणी केली असता गाईच्या पोटात २ तोंड असणारे वासरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या गाईने २ तोंडे त्याचबरोबर ४ डोळे, ४ शिंगे असणाऱ्या गोंडस अशा या वासराला जन्म दिला.