महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : सोलापूरच्या पालकमंत्रीपदापेक्षा माझ्या इंदापूरच्या पाण्याचा विषय महत्त्वाचा - दत्तात्रय भरणे - ujani dam water news

By

Published : Jun 27, 2021, 9:57 PM IST

राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री पदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचे पाणी नेले नसतानाही सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे. त्यामुळे पालकमंत्री पदातून मला मुक्त करावे, अशी मागणी मी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे एक महिन्यापूर्वीच केली होती', असे भरणेंनी म्हटले आहे. ते रविवारी (27 जून) इंदापूर तालुक्यात एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, उजनी धरणाचे पाणी इंदापूरला नेल्याचा आरोप भरणेंवर झाला होता. यावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी उजनी धरणात आंदोलनेही केली होती. यानंतर आता भरणेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details