महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

रणधुमाळी विधानसभेची : आमदार प्रणिती शिंदे साधणार का हॅटट्रिक? - सोलापूर मध्य मतदारसंघ

By

Published : Oct 19, 2019, 4:21 PM IST

Updated : Oct 20, 2019, 8:01 AM IST

सोलापूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यातील सगळ्याच मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे. मात्र त्यापैकी काही मतदारसंघातील लढती लक्ष्यवेधी ठरत आहेत. त्याचप्रमाणे सोलापूर मध्य या मतदारसंघातील लढतीकडेही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण, या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह त्याच्या कन्येसाठी ही अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. या मतदारसंघात चौरंगी आणि चुरशीची लढत होत आहे. त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे, तर शिवसेनेकडून एकेकाळचे शिंदेंचे सहकारी दिलीप माने, तसेच माकपचे आडम मास्तर आणि शिवसेनेचे बडंखोर नेते महेश कोठे यांच्यात लढत होत आहे.. त्या दृष्टीने या चौरंगी लढतीचा आढावा घेतलाय 'ईटीव्ही भारत' टीमने...
Last Updated : Oct 20, 2019, 8:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details