VIDEO : भूलीचे इंजेक्शन देऊन रस्त्यावरील जनावरांची तस्करी, अमरावतीतील घटना - अमरावतीत जनावरांची तस्करी
अमरावती : अनेकदा मोठ्या जड वाहनांतून गोवंशाची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्या. मात्र आता रस्त्यावरील मोकाट असलेल्या जनावरांची चक्क इनोव्हा गाडीतून तस्करी होत असल्याची घटना समोर आली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे ही घटना घडली. त्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. धामणगाव रेल्वेतील शिवाजी चौकात २७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता रस्त्यावरील मोकाट जनावरे एका इनोव्हा गाडीत भरताना या व्हिडिओत दिसत आहे. 3 माणसं हे कृत्य करताना दिसत आहेत. शिवाय, जनावरांना इंजेक्शन लावून त्यांना इनोव्हा गाडीत कोंबून नेत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आलं आहे. तर २ मिनिटांनी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी मागेच आली. हा सगळा प्रकार रात्री १ वाजता ते १ वाजून २९ मिनिटांपर्यंत झालाय. मात्र पोलिसांना या घटनेविषयी काहीही माहिती नसल्याच पोलीस सांगितले. तर, जनावरे पळवणारी टोळी सक्रिय असल्याने परिसरातील नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.