श्रावणातील चौथा सोमवार व अष्टमीनिमित्त विठ्ठल-रखुमाईची फळा-फुलांनी सुंदर आरास, पाहा व्हिडिओ - पंढरपूर न्यज
पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रावण महिन्यातील चौथा सोमवार व गोकुळाष्टमी निमित्त रंगीबेरंगी फुले व फळांची आरास करण्यात आली आहे. 5 प्रकारच्या रंगीबेरंगी फुलं व फळांमुळे सावळा विठुराया आणि रखुमाई मातेचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. अननस, कलिंगड सफरचंद, सिताफळ, मोसंबी व संत्री अशा 500 किलो फळांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा, सोळखांबी तसेच विविध भागांना जरबेरा, झेंडू, गुलाब अशा विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. 2000 टन फुलांचा वापर करण्यात आला. तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आलेला पोशाखही सावळ्या रुपावर नजर खिळवून ठेवत आहे. हवेली येथील पांडुरंग मोरे व नानासाहेब मोरे यांच्या वतीने पांडुरंगाची आणि रखुमाईची सजावट करण्यात आली आहे. मात्र मंदिर बंद असल्यामुळे याची देही याची डोळा विठुरायाचा सोहळा पाहण्याचा योग सध्या तरी नाही.
Last Updated : Aug 30, 2021, 9:44 AM IST