VIDEO: वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे, समाधानी नाही - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे - पुणे बाबासाहेब पुरंदरे मुलाखत
पुणे - महत्वाकांक्षी व हौशी माणूस कधीही पूर्णपणे समाधानी होत नाही. माझ्या वयाच्या ९९ वर्षात परमेश्वराने मला खूप काही मिळविण्याची ताकद दिली. त्याप्रमाणे मी प्रयत्नही करत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास, वाचन, लेखनकरुन स्वत: काहीतरी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, त्यामुळे वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे, पण समाधानी व तृप्त नाही. मला भारतातच पुर्नजन्म मिळावा आणि अपुरे सर्व काही पूर्ण व्हावे, अशी भावना पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात एका खासगी मुलाखतीत बोलत होते.