VIDEO : पाणी प्रश्नावरून काँग्रेस, मनसे पाठोपाठ शिवसेनेचेही घागर फोडो आंदोलन - मीरा भाईंदर शिवसेना आंदोलन
मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहरात सध्या पाणी प्रश्नावरून राजकारण पेटले आहे. काँग्रेस, मनसे पाठोपाठ शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक एक समोर घागर फोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मात्र, यावेळी सर्व शिवसैनिकांनी 'सत्ताधारी भाजपचा विजय असो' अश्या घोषणा देण्यात आल्या.