भाजपच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावे - शिवसेना - शिवसेना प्रवक्ते आमदार सुनिल प्रभु3
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था गजनीमधील आमिर खानसारखी झाली असल्याची टीका माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केली होती. यावर भाजपच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केलेल्या टीकेवर शिवसेना प्रवक्ते आमदार सुनिल प्रभु यांनी पलटवार केला. भाजप आणि भाजपच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.