ठाकरे सरकार कारवाई करताना गट-तट-पक्ष पाहत नाही - संजय राऊत - अमरावती
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. 'ठाकरे सरकार कायदेशीर कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहत नाही. एकेकाळी विरोधी पक्षनेतेही राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या (Amravati Voilance) घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं संजय राऊत म्हणाले.