अर्धापुर तालुक्यातील गावासह शिवार हरवले धुक्यात, पहा ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेरॅने टिपलेला हा व्हिडीओ
नांदेड - आज पहाटे नांदेड जिल्ह्यात अर्धापुर तालुक्यात अनेक गावं आणि शिवार ही धुक्यात हरवली होती. अतिवृष्टीनंतर पडलेले कडक उनं आणि आता धुक्याची चादर पसरल्याने लवकरच ऑक्टोबर हिटचा देखील फटका बसतो की काय अशी परिस्थिती आहे. या धुक्याच्या चादरीमुळे आता रब्बीच्या हंगामासाठी पोषक वातावरण निर्मिती होणार आहे. त्यामुळे अतिवृष्ठीत खरीप हंगाम हातचा गेला असला, तरी दाट धुक्याच्या हजेरीमुळे रब्बी हंगामाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान, ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनने टिपलेले हे अल्हाददायक दृष्य-