शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात; ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष - शिवसेनेचा दसरा मेळावा
मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा आज (शुक्रवार) षण्मुखानंद सभागृहात होत आहे. यापूर्वी दसरा मेळावा शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क येथे व्हायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येथून शिवसेनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत भाषणाच्या माध्यमातून पोचवले. या दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल व्हायचा. दरवर्षी मोठी गर्दी उसळत असे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गेल्या अनेक वर्षांपासून शिवतीर्थावर शिवसेनेचे विचार तळागाळातील शिवसैनिकांत पर्यंत पोहोचवण्याचे काम केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यानंतर विराजमान झाले. याच दरम्यान कोरोना आल्याने शिवसेनेच्या दसरा मेळावा ऑनलाइन घ्यावा लागला. मात्र यंदा संक्रमण कमी झाल्याने प्रथमच षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा मोजक्या पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे. शिवसैनक पदाधिकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. खबरदारीसाठी पोलिसांचा बंदोबस्तही मोठा वाढविण्यात आला असून या परिसराला छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. त्याप्रमाणे ते भगवे झेंडे लावण्यात आलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे. गेल्या दोन वर्षात विरोधकांनी आरोप प्रत्यारोपांची राळ उठवली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.