ST Workers agitation : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर संजय राऊत प्रतिक्रिया... म्हणाले... - महाआघाडी सरकार
मुंबई - अनिल परब ( Anil Parab ) यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना चांगले आर्थिक बळ मिळण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी कामगार नेते आणि काही पक्ष कामगारांचे नुकसान करत आहेत. एसटी कामगारांचे गिरणी कामगार करायचा आहे का? असा सवालही यावेळी शिवसेना नेते यांनी उपस्थित केला आहे. कष्टकऱ्यांचे नुकसान व्हावे असे महाआघाडी सरकार कधीही काम करणार नाही. एका विशिष्ट वर्गाची भाषा चांगली नाही. ते मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत होते. कामगारांसमोर तुम्ही एकेरी उल्लेख कसा करू शकता, असाही राऊत यांनी सवाल केला. एसटी कर्मचारी संप ( ST Workers Strike ) मागे घेत असतील तर स्वागत करतो. खोत, पडळकर यांनी भूमिका घेतली तिचे स्वागत करतो, असेही राऊत म्हणाले.