'मनसे'त सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही; शिवसैनिकांनी स्पष्ट केली भूमिका - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन भूमिकेबद्दल शिवसैनिकांना काय वाटते याबाबत त्यांच्याशी बातचीत केली असता शिवसेनेतून वेगळी होऊन मनसे स्थापन झाली आहे. फक्त पक्ष आणि झेंडा वेगळा करून उपयोग नाही खरा शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित आहे. यामुळे मनसेत सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.