शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे उदाहरण दाखवा, राजकारण सोडतो; संजय राऊतांचे आव्हान - Chandrakant Patil
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांच्या खंजीर खुपसण्याबाबतच्या वक्तव्यावरून सध्या शिवसेना आणि विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाटील यांना आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो, असे थेट आव्हानच राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.