शिवसेना नेते संजय राऊतांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ; पोलीस उपायुक्तांची घेतला आढावा
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद रॅली नंतर शिवसेना आणि भाजपमध्ये वाद विकोपाला पोहोचला. यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झालेला पाहायला मिळाला. त्यात संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद रॅलीवर देखील टीका केली. याच पार्श्वभूमीवर सेना आणि भाजपामध्ये वाढलेला हा तणाव पाहता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी आज संजय राऊत यांच्या निवासस्थानात जवळील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला आणि संजय राऊत यांची भेट देखील घेतली. याचा आढावा घेतला अक्षय गायकवाड यांनी...