शिवसेनेने आपला आक्रमक बाणा आजही सोडलेला नाही - दिवाकर रावते - शिवसेना नेते दिवाकर रावते प्रतिक्रिया
मुंबई - दसरा मेळाव्यात होणाऱ्या भाषणातून शिवसैनिकांना ऊर्जा मिळत असते. आधी ही ऊर्जा बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून मिळत होती. तर आता ती ऊर्जा आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून मिळते. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा संदेश बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिला आहे. त्या संदेशानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार हाकत आहेत. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या कामातून सुरू असून बाळासाहेबांचा वसा उद्धव ठाकरे चालवत असल्याचे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी व्यक्त केल आहे. तसेच शिवसेनेने आपला आक्रमक बाणा आजही सोडलेला नाही. आवाहन केल्यानंतर तेवढ्याच आक्रमकतेने रस्त्यावर उतरणारी आजची शिवसेनेची तरुण पिढी आहे. तसेच एकेकाळी मित्रपक्ष म्हणून असलेली भारतीय जनता पक्ष आरोपांवर आरोप करत आहे. मात्र या संकटावरही उद्धव ठाकरे मात करतील, असा विश्वास दिवाकर रावते यांनी व्यक्त केला आहे.