मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यास सरकारला दोन दिवसांचा 'अल्टिमेटम' - maratha kranti morcha
मुंबई - शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला दोन दिवसांचा वेळ दिला आहे. काल (शनिवार) मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 'मशाल मोर्चा' नेला होता. यावेळी सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मराठा समाजाच्या मागण्यावर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ त्यांनी सरकारला दिला आहे.